लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या बीदर विस्तारीकरणास लातूरकरांचा विरोध हाणून पाडण्यासाठी लातूर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त तैनात होता. रेल्वेचे व महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते. दरम्यान, सर्वपक्षीय लातूरकरांनी सकाळी दक्षिण मध्य रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देऊन विस्तारीकरणाला विरोध असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 3:00 AM