शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद

By आशपाक पठाण | Published: September 27, 2023 6:57 PM

२७ सप्टेंबरपासून महावितरणने केली अंमलबजावणी

लातूर : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, महावितरणने बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ पासून महावितरणच्या सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांवर २००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या अधिसूचनेनुसार २००० रुपयांची नोट ३० सप्टेंबर २०२३पासून चलनातून बंद होत आहे. परंतु बँकेच्या सुट्या व अर्ध वार्षिक ताळेबंद सादर करण्यासाठी होणारी गर्दी व अडचणी पाहता महावितरण मुख्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. २६ सप्टेंबरपर्यंत स्वीकारलेल्या २ हजार मूल्याच्या सर्व नोटा कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा / भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपासून ५ हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येते. सर्व प्रकारच्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची ऑनलाइन सोय २४ तास उपलब्ध आहे.

ऑनलाइन भरल्यास सव्वा टक्के सूटऑनलाइन वीजबिल भरल्याने ग्राहकाला ०.२५ टक्के आणि तत्पर देयक भरणा सवलतपोटी १ टक्का अशी एकूण १.२५ टक्के सूट तत्काळ मिळते. शिवाय विलंब आकार व व्याजातून सुटका होते. गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरbankबँकmahavitaranमहावितरण