कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्रीमती सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नानासाहेब जावळे- पाटील, महाराष्ट्र शिक्षण समितीचे कार्यकारी अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, दगडू सोळुंके आदी उपस्थित होते.
यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यावर्षी कोरोनामुळे मिरवणूक काढता आली नाही. मात्र, शिवप्रेमींसाठी अवधूत गुप्ते यांचा शिवगर्जना व भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकाचे आयोजन केले. शासन नियमांचे पालन करून सर्वांनी शिवजन्मोत्सव साजरा केला आहे. यावेळी जवळपास २५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ. किरण बाहेती, दत्ता शाहीर, इरफान सय्यद, शाहुराज थेटे, किशोर जाधव, शेषराव ममाळे, माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी, किशोर लंगोटे, पाशामियाँ आत्तार, ज्ञानेश्वर बरमदे, संतोष बरमदे, विनोद सोनवणे, जाकीर शेख, अरविंद चव्हाण, पिंटू पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, विकास आकडे, शरद पेठकर, माधव फट्टे, आशिष अटल, अंबादास जाधव, सुधाकर धुमाळ, पांडुरंग तोष्णीवाल, शाहुराज पाटील, संतोष लांबोटकर, सुमित ईनानी, महेश ढगे, अजय जाधव, विजय वडणे, राम लोंढे, अब्बू सय्यद, लक्ष्मीकांत सोमाणी, दिलीप मनियार यांनी परिश्रम घेतले.