लातूर : शहरासह जिल्ह्यात सध्या साथीच्या आजाराने कहर केला आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईडसह इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयातच काेराेनाच्या नियमांकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेकांच्या ताेंडाला मास्कही नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत काेराेनाची तिसरी लाट कशी राेखणार? हा प्रश्न प्रशासनासह यंत्रणेला सतावत आहे.
लातूर येथील शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात साथीच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी माेठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल हाेत आहेत. रुग्णालयासह परिसरात येणारे रुग्ण आणि नातेवाईकांमुळे साेशल डिस्टन्सिंगचा बाेजवारा उडाला आहे. त्याचबराेबर रुग्ण आणि नातेवाईकांकडून काेराेना नियमांचे फारसे पालन हाेताना दिसून येत नाही. यातून काेराेनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धाेका अधिक असल्याचे जाणकारांतून सांगितले जात आहे.
साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा...
लातूरच्या शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात सध्या माेठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल हाेणारे रुग्ण व नातेवाईकांमुळे साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. दरराेज हाेणाऱ्या गर्दीवर आता नियंत्रण आणण्याची गरज आहे. शिवाय, काेराेनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले...
सध्या बदललेल्या वातावरणाबराेबरच साथीचे आजारही बळावले आहेत. यामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण माेठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्याचबराेबर लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.
ओपीडी फुल्ल...
लातूर शहरातील शासकीय रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची माेठी गर्दी आहे. साथीच्या आजाराने बेजार झालेले रुग्ण दाखल हाेत आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजाराने त्रस्त असलेले नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येत आहेत. सध्या ओपीडी फुल्ल आहे.
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत...
काेराेना प्रादुर्भाव अद्यापही ओसरलेला नाही. दुसरी लाट ओसरली असली तरी, तिसऱ्या संभाव्य लाटेचा धाेका कायम आहे. यासाठी आता ठिकठिकाणी हाेणाऱ्या गर्दीला राेखण्याची गरज आहे. त्यावर निर्बंध आले नाहीत, तर रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती आहे.
दक्षता बाळगावी...
सध्या साथीच्या आजाराने कहर केला आहे. दरराेज डेंग्यू, मलेरियासह इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी आपल्या आराेग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गर्दी टाळली पाहिजे. शिवाय, काेराेनाच्या नियमांचे काटेकाेरपणे पालन हाेण्याची गरज आहे. साेशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, सतत स्वच्छ हात धुणे, मास्क कायम वापरण्यातूनच काेराेनाची तिसरी लाट राेखता येईल, असे आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.