लातूर : अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने शासकीय योजना दाखवून त्याची अंमलजावणी केली जात नसल्याचा आरोप करीत लातुरात स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेच्या वतीने सोमवारी हक्क नव्हे तर थट्टा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी गंजगोलाईत कार्यकर्त्यांनी कश्मीरची खेळी लातूरच्या बाजारात असे फलक लावून आंदोलन करण्यात आले.
लातूर शहरात 'काश्मीर' ची केळी ? अल्पसंख्याक 'हक्क दिना'निमित्त शासनाने केलेली अल्पसंख्याक समाजाची 'थट्टा' कशी असते ते आज 'मार्मिक' पद्धतीने दाखविण्यात आले. अक्षरशा काश्मीरची केळी म्हणून केळी विकण्यात आली. सरकारही असंच अलबेल चाललेलं आहे अल्पसंख्याक योजनांची आणि समाजाची थट्टा करून योजनांचा फाजील बागुलबुवा करून धूळफेक करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेचे अध्यक्ष मोहसीन खान यांनी केला. यावेळी शादुल शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.