शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात १६ हजार बालके विविध आजारांनी बेजार

By संदीप शिंदे | Published: February 28, 2023 6:20 PM

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात दीड लाख बालकांची तपासणी पूर्ण

लातूर : अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अभियान राबविले जात आहे. ९ फेब्रुवारीपासून या अभियानास सुरुवात झाली असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार ९०९ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये १६६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे समोर आले असून, यातील १२ हजार ४७६ जणांवर प्राथमिक औषधाेपचार करण्यात आले आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पथके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील पथकांमार्फत जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये ९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील २५२२ पैकी ७१ अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील १ लाख ५३ हजार ६०३ बालकांपैकी ८ हजार ४२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २ हजार २५१ पैकी १२८६ शाळांची तपासणी करण्यत आली असून, ६ ते १८ वयोगटातील ४ लाख ३ हजार ५७९ बालकांपैकी १ लाख ६० हजार ९०९ जणांची तपासणी झाली. यामध्ये १६ हजार ६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे आढळून आले असून, १२ हजार ४७६ बालकांवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहेत.

तसेच पुढील उपचाराकरिता ५ हजार ८९७ बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. तर ४२ विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.

मार्चपर्यंत मोहीम संपविण्याचे आव्हान...आरोग्य विभागाच्या वतीने जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. दोन महिने हे अभियान सुरु राहणार असून, यामध्ये शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पुर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, सध्या अभियानाला गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार बालके...जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालके आहेत. यात अंगणवाडीमधील १ लाख ५३ हजार ६०३ तर शाळांमधील ४ लाख ४ हजार ५७९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, आजारी आढळलेल्या १६ हजार बालकांपैकी १२ हजार जणांवर औषधोपचार झाले आहेत. यामध्ये खोकला, सर्दी, दात किडलेले, रक्ताक्षय, दृष्टीदोष, जन्मजात व्यंग आदी आजार असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य