शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

स्थलांतर करताय तर मुलांच्या शिक्षणाबाबत रहा निश्चिंत; 'शिक्षण हमी कार्ड' ने शिक्षणाची गॅरंटी!

By संदीप शिंदे | Published: November 18, 2022 7:03 PM

शिक्षण हमी कार्ड द्वारे ऊसतोड मजूर, कामगारांची मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात

- संदीप शिंदेलातूर : दिवाळीनंतर जिल्ह्यातून हजारो कामगार मजुरी, ऊसतोडणीसाठी परगावी स्थलांतरित झाले, तर काही कामगार दुसऱ्या गावात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा कामगारांनी गाव सोडले तरी त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सुटू नये, याची गॅरंटी प्रशासन घेणार आहे. यासाठी स्थलांतर होणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार असून, राज्यातील कोणत्याही शाळेत या कार्डवर प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील चाकूर, औसा, रेणापूर, जळकोट या तालुक्यामध्ये मजुरीसाठी दरवर्षीच स्थलांतर होते. कामगारांसोबत त्यांची मुलेही बाहेरगावी निघून जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटते. परिणामी, बालकांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत शिक्षण विभाग व अन्य विभागांच्या वतीने गावनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये सापडणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.

प्रत्येक गावांमध्ये होणार सर्वेक्षण...प्रत्येक गावात जाऊन तेथील पालक स्थलांतरित झाले का किंवा होणार आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. स्थलांतर होत असल्यास त्यांच्या मुलांना गावातच थांबविण्याची विनंती केली जाईल. मात्र, पालकांकडून नकार आल्यास मुलांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.

कार्डवर राहणार मुलांची संपूर्ण माहिती...संबंधित मुलाची शिक्षण हमी कार्डवर शालेय रेकॉर्डवरील माहिती त्याच्या फोटोसह राहणार आहे. तो ज्या जिल्ह्यात किंवा गावात स्थलांतरित होईल, तेथील जवळच्या शाळेत हे कार्ड दाखविताच शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. दोन्ही ठिकाणचे मुख्याध्यापक एकमेकांशी संपर्क साधून स्टुडंट पोर्टलवर डिटॅच व अटॅच करणार आहे.

गावी परतल्यास कार्डवरच मिळणार प्रवेश...रोजगाराचा कालावधी संपल्यानंतर संबंधित कुटुंब पुन्हा लातूर जिल्ह्यात परतल्यावर याच कार्डाच्या आधारे संबंधित विद्यार्थ्याला मूळ शाळेतही दाखल करून घेतले जाणार आहे. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तालुकानिहाय प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी...स्थलांतरीत बालकांच्या सर्वेक्षणासाठी २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान गावनिहाय मोहीम राबविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम आहे. जिल्हास्तरावर सीईओंच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार असून, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.- वंदना फुटाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद