लातूर : शेतकरी मुगाच्या राशी करून विक्रीसाठी आणत आहेत. सध्या बाजारपेठेत जवळपास १० हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक होत आहे. परंतु, खुल्या बाजारपेठेत हमीभावाच्या तुलनेत दोन हजार रुपयांचा फटका शेतकºयांना बसत आहे. शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अद्यापही हालचाली सुरू झाल्या नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.सध्या सण-उत्सव सुरू असल्याने शेतकºयांना पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे हे शेतकरी राशी झालेला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, बाजारपेठेत हमीभावापर्यंतही मुगाला भाव मिळत नाही. लातूर बाजार समितीत दररोज २ हजार क्विंटलपर्यंत तर इतर १० बाजार समित्यांत प्रत्येकी ९०० ते १००० क्विंटल आवक होत आहे. शासनाने मुगाला ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात बाजारात मात्र सर्वसाधारण भाव ४ हजार ८८० रुपये मिळत आहेत.नाफेडचे हात वरहमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्यापही सूचना आल्या नसल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.
हमीभाव खरेदी केंद्र नसल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 3:19 AM