शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला; हाताशी आलेला घास हिरावला

By हरी मोकाशे | Published: April 08, 2023 5:26 PM

वादळी वाऱ्यासह पाऊस; पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...

औराद शहाजानी / वलांडी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी तसेच देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शुक्रवारी रात्री जोरदार वळवाचा पाऊस झाला. त्यामुळे रबी ज्वारी, करडीसह भाजीपाला, द्राक्षे आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षे मातीमोल झाले आहेत. द्राक्षांचे घड फुटल्याने त्यावर मधमाशा हल्ला करुन फस्त करीत आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह तगरखेडा, सावरी, माने जवळगा, हलगरा, म्हसाेबावाडी, संगारेड्डीवाडी, हालसी, काेयाजीवाडी, शेळगी, बाेरसुरी, देवणी तालुक्यातील वलांडी, हिसामनगर, जवळगा, हेळंब या भागात शुक्रवार व शनिवारी जाेरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडटात पाऊस झाला. त्यात रब्बी ज्वारीसह करडी, भाजीपाला, फळबागाचे मोठे नुकसान झाले.

तगरखेडा, सावरी, म्हसाेबावाडी येथील गोविंद बिरादार, गोपाळ पाटील, माणिक अंचुळे आदींच्या शेतातील द्राक्षाच्या बागेचे नुकसान झाले. जवळपास १५ एकरवरील द्राक्षे हे निर्यातीसाठी होते. अवघ्या दोन दिवसांत तोडणी करण्याचे नियोजन होते. मात्र, वादळी वारे आणि पावसाने द्राक्षांच्या घडांना मार लागला. त्यामुळे द्राक्षाची नासाडी झाली. दरम्यान, आद्रता वाढल्याने द्राक्षांची साल कमजोर होऊन गाेडवा कमी झाला. त्यामुळे द्राक्षे फुटली आहेत. आता त्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे.

औराद येथील शेतकरी सत्यवान मुळे, संताेष भंडारे यांच्या शेतातील शेवग्याच्या शेंगांची फुल गळती होऊन जमिनीवर सडा पडला आहे. तसेच अमाेल ढाेरसिंगे, भागवत उगिले, प्रदीप ढाेरसिंगे, उमाकांत भंडारे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २४ तासात ६० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...वर्षभर लाखोंचा खर्च करून बाग मुलाप्रमाणे जपली. तोडणीवेळी अवकाळी पाऊस होऊन हाता- ताेडांशी आलेला घास हिरावला. माझ्या तीन एकर बागेत २० टन द्राक्षे विक्रीसाठी तयार होते. एक किलाे द्राक्षासाठी २५ रुपये खर्च झाला आहे. सततच्या पावसामुळे पदरात १५ ते २० रुपये प्रति किलो असा दर पडत आहे. शिवाय, निम्मी द्राक्षे खराब झाली असून एका घडाला १० ते १५ मधमाशा बसून रस शाेषण करीत आहेत.- गोविंदराव बिराजदार, शेतकरी.

वीज पडून सात शेळ्या दगावल्या...देवणी तालुक्यातील जवळगा येथील राम बालुरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात दोन शेळ्या दगावल्या. तसेच हिसामनगर येथील भरत वाघमारे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात एका शेळीसह चार पिल्ले दगावले. त्याचबरोबर हिसामनगर येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने धान्य भिजले.

नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी...वलांडीसह हिसामनगर, जवळगा, हेळंब परिसरात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हिसामनगर- हेळंब रस्त्यावरील पुलाचा कठडा पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बाळासाहेब डिगोळे यांच्या शेतातील शेडवर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी अतिश बनसोडे, कृषी सहाय्यक बंडगर, सरपंच विजयकुमार मुखे, सरपंच हनुमंत बिरादार, सरपंच सोपान शिरसे आदींनी केली.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूरagricultureशेती