शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड

By हरी मोकाशे | Published: March 11, 2024 7:07 PM

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांचीही सोनेरी कामगिरी

उदगीर (जि. लातूर) : महाराष्ट्र केसरी किताबची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवित खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजविला. त्याचबरोबर संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने येथील तालुका क्रीडा संकुलात ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. श्रीगोंद्याच्या (जि. नगर) भाग्यश्री फंड हिने ६२ किलो गटातील अंतिम लढतीत सांगलीच्या पुजा लोंढेला पहिल्या फेरीतच लोळविले. त्यामुळे तिने सुवर्णपदक जिंकले. पुजा लोंढे रौप्यपदकाची मानकरी ठरली. साताऱ्याच्या सिद्धी कणसेने कांस्यपदकाची कमाई केली.

महिलांच्या ७२ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या संजना बागडी हिने लातूरच्या आराधना नाईकचा पराभव केला. आराधनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. साताऱ्याची प्रिती पाटील व नगरची सोनिया सरक यांना कांस्यपदके मिळाली. ५७ किलो गटात साताऱ्याची आश्लेषा बागडे व लातूरची अंकिता जाधव यांच्यात तोडीस तोड लढत झाली. लढत २-२ अशी बरोबरीत असताना आश्लेषाने चितपट कुस्ती मारून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पिंपरी-चिंचवडची निर्मिती मुन्हे व कोल्हापूर शहरची श्रद्धा कुंभार यांनी कांस्यपदकांची कमाई केली. ५३ किलो गटात कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कोल्हापूरच्याच तृप्ती गुट्टा हिला धूळ चारत सुवर्णपदकाची कमाई केली. सेजल धरपळे, पल्लवी बागडी यांना कांस्यपदके मिळाली. विजेत्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक उदय जोशी, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदींची उपस्थिती होती.

श्रीकांत, सुरज, पार्थ, ओंकार, राकेश, सतीशला सुवर्णपदक...खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुरूष विभागात कोल्हापूरचा सुरज अस्वले व नाशिकचा पवन डोन्नर यांच्यातील लढत लक्ष्यवेधी ठरली. त्यात सुरजने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. पवनला रौप्यपदक, कोल्हापूरचा विजय डोंगरे व पुणे शहरचा अमोल वालगुडे यांना कांस्यपदक मिळाले. ६० किलो गटात कोल्हापूरच्या श्रीकांत कामण्णने सोलापूरच्या आकाश सरगरचा पराभव करीत सुवर्णपदक मिळविले. आकाशला रौप्य तर नाशिकच्या अतुल मेदडे व कोल्हापूरचा प्रतिक पाटील यांना कांस्यपदक मिळाले. ६७ किलो गटात पुणे शहरच्या पार्थ कंधारेने जळगावच्या अरबाज पठाणचा धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकाविले. अरबाजला रौप्य, पुणे जिल्ह्याचा वैष्णव आडकर व कोल्हापूरचा माऊली टिपुगडे यांनी कांस्यपदके जिंकले. ७२ किलो गटात कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने सोलापूरच्या किरण सत्रेचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. किरणला रौप्यपदक तर नाशिक जिल्ह्याचा पार्थ कमाळे व सांगलीचा जयदीप बडरे हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७४ किलो गटात कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने कोल्हापूरच्याच अभिजीत भोसलेचा पराभव करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. पुणे जिल्ह्याचा अनिल कचरे व कोल्हापूरचा सातपा हिरगुडे यांना कांस्यपदके मिळाली. ९७ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या सतीश मुंढेने कोल्हापूरच्या रोहन रेडेचे आव्हान मोडीत काढले. रोहनला रौप्यपदक, सोलापूरचा निकेतन पाटील व लातूरचा योगीराज नागरगोजे यांना कांस्यपदके मिळाली.

टॅग्स :laturलातूरWrestlingकुस्ती