विहिरीवरील वीज मोटारीची चोरी
लातूर : जावळी शिवारात विहिरीवर बसविलेल्या तीन एचपी वीज मोटार तसेच स्टार्टरची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत गोपाळ नारायण मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोटार व स्टार्टरची किंमत २२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भरधाव वेगातील वाहनाची ऑटोला धडक
लातूर : लातूर-बार्शी रोडवरील वेअर हाऊसनजीक भरधाव वेगातील एमएच २६ एके ३३३९ या क्रमांकाच्या कारने समोरून येणाऱ्या एमएच २४ एयू १६६४ या क्रमांकाच्या ऑटोला जोराची धडक दिली. यात ऑटोमधील प्रवासी जखमी झाले. याबाबत विनायक तुकाराम करमले (रा. गातेगाव) यांनी दिलेल्या पोलीस ठाण्यात गातेगाव पोलीस ठाण्यात एमएच २६ एके ५३३९ या क्रमांकाच्या कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजगीरवाड करीत आहेत.
चालू स्थितीत वाहन उभा केल्याने गुन्हा
लातूर : नळेगाव रोड येथील केके पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाजवळ चालू स्थितीत वाहन उभे करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याच्या कारणावरून एमएच २४ एएस ५७३२ या क्रमांकाचे वाहन चालक इब्राहिम बालेसाहब मुजेवार (रा. करकली, रा. उदगीर) याच्याविरुद्ध पोहेकॉ. युसुफ अली मुर्तुज अली फावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. जोंधळे करीत आहेत.