...
निलंगा येथे संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक
निलंगा : संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उमाकांत उफाडे, जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे, प्रा.डॉ. हंसराज भोसले, उदय निटुरे, अनिल जाधव, प्रमोद कदम, इर्शाद शेख, सचिन नाईकवाडे, संतोष गायकवाड, अमोल माने, अनिल माने, अर्जुन जाधव, परमेश्वर बोधले, कृष्णा बिरादार, हाज्जू नाईकवाडे, स्वप्निल बिरादार, मेहराज शेख, उस्मान शेख, बाळू बिरादार, रफीक शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद कदम यांनी केले.
...
दिल्लीतील आंदोलनाला स्वाभिमानीचा पाठिंबा
शिरुर अनंतपाळ : केंद्र सरकारने शेतमालासंर्दभात केलेल्या नवीन कायद्याविरोधात दिल्लीत पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देऊन केंद्र सरकारच्या विराेधात संताप व्यक्त केला. हा कायदा शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करीत तो रद्द करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष राम नलवाडे, ॲड. पुंडलिक पवार, शंकर बिरादार, अमित पानगावे, दिलीप गुराळे आदींच्या स्वाक्षऱ्यां आहेत.
...
चाकुरात कुष्ठ, क्षयरोगींची शोधमोहीम सुरु
चाकूर : आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेची तालुक्यात मंगळवारी ग्रामीण रुग्णालयातून सुरुवात करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य सहाय्यक पी.आर. डावळे, जी. डी. ओपळकर, संतोष किनगावकर, सचिन बिराजदार, अमाेल उडगे, अनिल डावरे, रेणुका शिंदाळकर आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने १६ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून तपासणी करुन घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंडगे यांनी केले.