शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

किलीमांजारो शिखरावर सर्वांत मोठा तिरंगा फडकावला, लातूरच्या दीपकची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:37 AM

लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला.

देवणी (जि़ लातूर) : लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. भारताचे राष्ट्रगीत गात हेल्मेट वापराचा संदेशही त्याने तेथून दिला.विश्वविक्रमी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, गिर्यारोहक बालाजी जाधव, निखिल यादव आणि सागर भारती यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्सप्लोरर ग्रुपद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. किलीमांजरो हे शिखर आफ्रिकेतील टांझानियात समुद्रसपाटीपासून १९,३४१ फुट उंचीवर आहे़ एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १५ आॅगस्ट २०१५ रोजी हे शिखर सर केले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दीपकने ही कामगिरी केली. शून्याच्याखाली तापमान, प्रचंड वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक त्याने ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्याने २९ जून रोजी सुरुवात केली होती. आगामी काळात ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च माउंट एलब्रुस शिखर सर करणार असल्याचे दीपक म्हणाला़ त्यास पुण्यातील जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन लाभले़दीपक हा मुळचा देवणी तालुक्यातील सिंधीकामट येथील रहिवासी असून वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण हिंगोली येथे तर माध्यमिक शिक्षण जालना येथे झाले़ बीक़ॉमचे शिक्षण हिंगोलीत पूर्ण करुन पुणे येथे तो सध्या युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे़‘लिमका बुक’कडे प्रस्तावदीपक कोनाळेच्या या कामगिरीचा प्रस्ताव लिमका बुक आॅफ रेकॉर्डसाठी पाठविला जाणार असल्याचे विश्वविक्रमी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची मोहीमही माझ्यासाठी सर्वांत महत्वाची मोहीम होती. शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही चढाई पूर्ण केली़ भारताचा सर्वात मोठा तिरंगा ध्वज किलीमांजारो शिखरावर घेऊन गेलो़ जेव्हा मी राष्ट्रगीत गात होतो, त्यावेळी माझ्यासाठीचा खूप भावूक क्षण होता. - दीपक कोनाळे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या