शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

दोन वाहनांच्या शर्यतीत दुचाकीस्वारांचा हकनाक बळी; दोघांचा जागीच मृत्यू

By हरी मोकाशे | Published: December 17, 2022 5:59 PM

वानवडा मोडजवळील घटनेनंतर वाहनासह चालक फरार झाला आहे

औसा (जि. लातूर) : औसा- तुळजापूर महामार्गावरील वानवडा मोडजवळ शनिवारी सकाळी ११. ३० वा.च्या सुमारास लातूरकडे निघालेल्या दुचाकीस्वारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एकाच्या अंगावरून चाक गेला, तर दुसऱ्याच्या डोक्यास जबर मार लागला. त्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

कल्याण उत्तम पाटील (गरड) (५२, हमु. तोरंबा) व श्रीमंत सदाशिव बागल (४८, रा. तोरंबा, ता. जि. उस्मानाबाद) अशी मयतांची नावे आहेत. कल्याण पाटील व श्रीमंत बागल हे तोरंबा येथून लातूरकडे मेहुण्याच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाकरिता दुचाकी (एमएच १३, बीसी ५०९९) वरुन शनिवारी सकाळी जात होते. तेव्हा वानवडा मोडजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात पाठीमागे बसलेल्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर दुचाकी चालकाच्या शरीरावरुन वाहनाचे चाक गेल्याने त्यांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी सपोनि ज्ञानदेव सानप, बीट अंमलदार औटी यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी ५ वा. पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दोन वाहनांची शर्यत दोघांच्या जीवावर बेतली...शनिवारी सकाळी ११. ३० वा.च्या सुमारास बोरफळकडून औश्याकडे भरधाव वेगात जाणारी दोन वाहने एकमेकाला ओव्हरटेक करीत होती. या चढाओढीत रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वारास वाहनाने उडविले. दोघांची पुढे जाण्याची शर्यत दोन कुटुंब प्रमुखांच्या जीवावर बेतल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू