लोकांच्या जीवितास धोका; एकाविरुद्ध गुन्हा
रेणापूर : सारोळा येथील शिवाजी चौकात रोडच्या मध्यभागी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत वाहन उभे केल्याप्रकरणी रेणापूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एमएच २४ एडब्ल्यू ८९१६ या क्रमांकाचे वाहन रस्त्याच्या मध्यभागी थांबविले. यामुळे रहदारीला अडथळा झाला. शिवाय, लोकांच्या जीवितास धोका होईल, अशा स्थितीत वाहन उभे केले. या कारणावरून पोहेकॉ. सदाशिव शिवलिंग हुंडेकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २४ एडब्ल्यू १८१६ या क्रमांकाच्या कारचालकाविरुद्ध रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. घाडगे करीत आहेत.
रस्त्याच्या मधोमध वाहन उभे; चालकाविरुद्ध गुन्हा
रेणापूर : रस्त्याच्या मधोमध मिनीडोअर टेम्पो उभा करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याच्या कारणावरून एमएच २२-३८३२ या क्रमांकाच्या टेम्पो चालकाविरुद्ध रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पोहेकॉ. सदाशिव शिवलिंग हुंडेकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. घाडगे करीत आहेत.
वेगमर्यादेचे उल्लंघन; एकाविरुद्ध गुन्हा
लातूर : भरधाव वेगात लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत वाहन चालवीत असताना रिंग रोड परिसरात एक जण मिळून आला. याबाबत पोना. मयूर कडाजी मुगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एमएच २४ एम ६८१६ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध कलम १८५ मोवाकाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसइ. जगताप करीत आहेत.
विनापरवाना जुगार; दोघांविरुद्ध गुन्हा
लातूर : विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन जुगाराच्या आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा मटका खेळवीत असताना दोघे जण तांदुळजा येथे आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १ हजार ८५० रुपये, एक मोबाईल असा एकूण ८ हजार ८५० रुपयाचा ऐवज जप्त केला. याबाबत पोउपनि. सुदर्शन मोहन सुर्वे यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून समीर रशिद पठाण (रा. तांदुळजा) व अन्य एकाविरुद्ध कलम १२ (अ) भादंविप्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. तपास पोउपनि. सुर्वे करीत आहेत.