१ किमी परिघातील पक्षी नष्ट करणार...
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या ठिकाणी पक्षी दगावले आहेत आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याठिकाणच्या एक किमी परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. केंद्रेवाडी येथील पोल्ट्रीमध्ये ८ हजार पक्षी आहेत. ते नष्ट केल्यानंतर एक किमी परिघातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
उत्पादकास मिळणार आर्थिक मदत...
सहा आठवड्यांच्या आतील एका पक्ष्याला २० रुपये, तर सहा आठवड्यांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक पक्ष्याला ७० रुपये अशी मदत कुक्कुट पालन व्यावसायिकास दिली जाणार आहे. केंद्रेवाडी येथील बहुतांश पक्षी सहा आठवड्यांच्या आतील आहेत, तर सुकणी येथील नष्ट करण्यात आलेले १६ पक्षी सहा आठवड्यांपेक्षा अधिक वयाचे होते, असेही पशुसंवर्धन अधिकारी पडिले यांनी सांगितले.
वंजारवाडी अहवालाची प्रतीक्षा...
उदगीर तालुक्यातील वंजारवाडी येथील ५५ पक्षी दगावले आहेत. या मृत पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्याचा अहवाल बुधवारपर्यंत प्राप्त होईल.