पाहुण्यांचे स्वागत लोकमतचे तालुका वार्ताहर व्ही. एस. कुलकर्णी, श्रीपाद सिमंतकर, विनायक चाकूरे, रसूल पठाण, डॉ. धनाजी कुमठेकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांनी केले. शिबिरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्मीकांत स्वामी, निखिल तोंडारे, राजकुमार मोरे, गणेश बेळकट्टे, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे डॉ. उषा काळे, डॉ. रश्मी चिद्रे, डॉ. सचिन टाले, डॉ. गुरुराज वरनाळे, डॉ. दीपिका भद्रे, डॉ. अस्मिता भद्रे, सामान्य रुग्णालयाचे डॉ. शशिकांत डांगे, डॉ. ज्योत्स्ना डावरे, राणी पवार, डॉ. संजय बिरादार, डॉ. महेश वाघमारे, डॉ. बालाजी भोसले, मानकोळे आदींनी पुढाकार घेतला. रक्त संकलनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या डॉ. के. टी. दळवी, डॉ. कांचन भोसले, डॉ. कृष्णा पवार, बी. डी. सूर्यवंशी, संजय कांबळे, गौरीशंकर स्वामी, विराज साबळे व वामन शिंदे यांनी सहकार्य केले. यावेळी १५१ वेळा रक्तदान करणारे डॉ. रामेश्वर बाहेती यांचा सत्कार करण्यात आला.
सकारात्मक विचार अन् सामाजिक बांधिलकी हेच लोकमतचे यश...
माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले, सकारात्मक विचार अन् सामाजिक बांधिलकी जपत वृत्तपत्र क्षेत्रात लोकमतने दिलेले योगदान अतुलनीय आहे. सामाजिक व राजकीय जीवनात आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले जवाहरलाल दर्डा यांच्यासोबत १२ वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. वसंतराव नाईक यांचे जवळचे सहकारी म्हणून बाबुजींची वेगळी ओळख निर्माण झाली होती. आमदार व कार्यकर्त्यांना समजावून सांगत काम करण्याची त्यांची छबी होती. मराठवाड्यासाठी मी त्यांच्याकडे काही मागणी केली की, ते लगेच होकार द्यायचे. अशा अनेक आठवणी माजी मंत्री जाधव यांनी सांगितल्या.
संस्था, संघटनांचा पुढाकार...
या शिबिरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ॲण्ड चॅरिटेबल हॉस्पिटल, सामान्य रुग्णालय व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी पुढाकार घेतला.
१४ डॉक्टरांचे रक्तदान...
डॉक्टरांनी ही सामाजिक बांधिलकीतून रक्तदान केले. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार यांच्या पत्नी राणी पवार, मुले डॉ. रोहन व डॉ. ऋत्विक पवार यांच्यासह एकूण १४ डॉक्टरांनी रक्तदान केले. तसेच श्री व सौ. शुभांगी प्रदीप सानप या दांपत्याने रक्तदान केले.