विनाकारण मारहाण पाच जणांविरुद्ध गुन्हा
लातूर : विनाकारण भांडणाची कुरापत काढून, शिवीगाळ करून धानोरा येथे मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत अनिकेत नारायण चेंडकाळे (रा. धानोरा, ता. औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दयानंद गोविंद मुसळे व अन्य चौघा जणांविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा नोंद आहे. पुढील तपास लामतुरे करत आहेत.
विट डोक्यात मारून केले जखमी
लातूर : तू मला फोनवर शिवीगाळ का केलास असे म्हणून शिवीगाळ करत विट घेऊन डोक्यात मारून एकाला जखमी केले शिवाय भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या आई-वडिलास शिवीगाळ केल्याची घटना लातूर शहरातील संभाजीनगर येथे घडली. याबाबत परमेश्वर नामदेव येमले (रा. अयोध्या नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय कलाप्पा राचटे (रा. क्वाईलनगर) याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हॉकी स्टीकने डोक्यात मारून केले जखमी
लातूर : फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली असता हॉकी स्टीकने डोक्यात मारून एकाला जखमी केल्याची घटना शहरातील संभाजीनगर येथे घडली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारून जिवे मारण्याची धमकी दिली, असे अजय कलाप्पा राचटे (रा. क्वाईल नगर) यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कृष्णा रेड्डी व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. जाधव करत आहेत.
बँकेसमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी
लातूर : रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील एसबीआय बँकेसमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ एए ७४२७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सुरेश गंगाधर धावडे (रा. कुलस्वामिनी नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसई. जगताप करत आहेत.
आंब्याचे झाड तोडण्यावरून मारहाण
लातूर : रेणापूर तालुक्यातील लखमपूर शिवारात शेतामध्ये झोपले असताना आरोपितांनी संगनमत करून आंब्याचे झाड तोडण्याच्या कारणावरून फिर्यादीला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत रेणापूर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विष्णू रामदास इंगोले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किसन गवंडगावे व अन्य तिघांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. जाधव करत आहेत.
पेट्रोल पंपावर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला
लातूर : लातूर शहरातील रिंगरोड परिसरातील एका पेट्रोल पंपावर पार्किंग केलेल्या एमएच २४ एझेड ७९९६ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सिद्धेश्वर महादेवअप्पा लामतुरे (रा. बसवेश्वर चौक, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. जहागीरदार करत आहेत.