पिकविण्यासाठी किंवा चांगला रंग येण्यासाठी वापरले जाते केमिकल...
फळे पिकविण्यासाठी अथवा फळांना चांगला रंग यावा, यासाठी विविध रासायनिक प्रक्रिया, केमिकल्सचा वापर केला जात आहे. ते आराेग्यासाठी हानिकारक आहे. फळांची खरेदी करण्यापूर्वी आपण हे तपासून पाहिले पाहिजे.
असे ओळखा नैसर्गिक पिकविलेले फळ...
नैसर्गिक पद्धतीने पकविलेल्या फळांची चव बदलत नाही. केमिकल्स, रसायनांचा वापर करून पिकविलेल्या फळांची मात्र चव कडवट लागते. गाेड फळे तुरट लागतात. केळी हिरवी वाटतात. मात्र, एक दिवसानंतर ती काळी पडते.
सात महिन्यांत मात्र कारवाई शून्यावर...
बाजारात दाखल हाेणाऱ्या फळांवर आणि ती पिकविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेवर काेणाचे नियंत्रण आहे, हा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. गत सात महिन्यांत संबंधित विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा आकडा मात्र शून्यावर आहे.