प्रारंभी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स आणि नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. त्यानंतर मुलांना फळ आणि भोजन वाटप करण्यात आले. यावेळी बालगृहाचे मार्गदर्शक अण्णासाहेब कदम, मुख्याध्यापक पंडित लव्हरे, विशेष शिक्षक ओमप्रकाश गोविंदपुरे, नितीन वाघ, विक्रम गुणाले, विलास पवार, सुनील डाके, संकेत चव्हाण, विजय शिंदे, योगिता जायभाये, चेतन देशमुख, निलेश क्षीरसागर, सुधीर भोसले यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटामुळे फिजिकल डिस्टन्स आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत बालगृहात जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
बालगृहात दिव्यांग दिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:58 AM