औसा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सभापतीपदी चंद्रशेखर सोनवणे तर उपसभापती पदावर प्रा. भिमाशंकर राचट्टे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
औसा बाजार समितीमध्ये भाजपाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. आ. अभिमन्यु पवार यांनी या निवडणुकीसाठी नियोजन केले होते. सोमवारी पदाधिकारी निवड करताना सभापतीपदी अनुभवी संचालक म्हणून काम पाहिलेले चंद्रशेखर सोनवणे यांना तर बाजार समितीच्या कारभाराचा अनुभव असणारे प्रा. भीमाशंकर राचट्टे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आली. निवड सभेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी काम पाहिले. यावेळी ए.एस. कदम, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, मदनलाल झंवर, शिवलिंग औटी यांच्यासह नुतन संचालक प्रविण कोपरकर, संदिपान लंगर, युवराज बिराजदार, प्रकाश काकडे, अजित धुमाळ, चंद्रकाला झिरमिरे, संतोषी वीर, विकास नरहरे, ईश्वर कुलकर्णी, राधाकृष्ण जाधव, रमाकांत वळके, मोहन कावळे, गोविंद भोसले, सुरेश औटी, धनराज जाधव, शंकर पुंड आदींसह बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे, अब्दुल हक्क, भुजंग सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.