वाढवणा बु. : छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे खरे नायक होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याचे तोरण बांधले. त्यांचे विचार आणि स्वप्न आपण तरुणांनी साकार केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. अनिल मगर यांनी केले.
येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वाय. के. मुंजेवार होते. यावेळी मुख्याध्यापक एस. यु. आमगे, प्रा. एस. पी. दहिफळे उपस्थित होते. मुंजेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी दृष्टिकोन कसा मांडला, हे सांगून वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाची उत्तम आखणी याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. रामदास केदार यांनी केले तर आर. एस. पठाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी. जी. मुधाळे, प्रा. ए. एम. मुळे, एम. एम. गडीकर, एन. एस. काबंळे, प्रा. एम. एम. इंद्राळे, जी. एस. स्वामी आदींनी पुुढाकार घेतला.