शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीत; ग्रामसेवक गायब!

By हरी मोकाशे | Published: May 16, 2024 8:13 PM

तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना.

लातूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी अचानक शहरानजिकच्या चार गावांतील ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील कारभाराची माहिती घेतली. तेव्हा दोन ठिकाणी ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे आढळले तर एका ठिकाणी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सीईओंनी तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेवर जवळपास दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पदाधिकारी नसल्याने अनेकदा गाव पातळीवरील अडीअडचणी जिल्हा परिषदेपर्यंत पाेहोचत नाहीत. त्यामुळे समस्यांची उकल होत नाही. शिवाय, ग्रामपंचायतस्तरावरील सर्व रेकाॅर्ड अद्ययावत आहे का याची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी गुरुवारी दुपारी ३ ते ५.३० वा. च्या सुमारास तालुक्यातील गंगापूर, चांडेश्वर, खोपेगाव, वासनगाव येथील ग्रामपंचायतीस अचानक भेटी देऊन झाडाझडती घेतली. यावेळी सीईओंनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत इमारत, ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड, वीजबिलमुक्तीसाठीचे प्रयत्न अशा विविध बाबींची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान गंगापूरच्या ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे आढळले. तसेच खोपेगाव येथील ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. वासनगावातही तशीच परिस्थिती होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्युत मोटारीच्या दुुरुस्तीसंदर्भातील गेलो होतो, असे तेथील ग्रामसेवकांनी सांगितले.

नोटिसा बजावून कार्यवाही होणार...जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे चार ग्रामपंचायतींना भेटी देऊन झाडाझडती केली. बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे आढळले. तसेच दोन ठिकाणी ग्रामसेवक अनुपस्थित होते. त्याची सीईओंनी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर