शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

चिक्की आणि कर्ज घोटाळा जनमनात ठसवा- अजित पवार

By admin | Published: August 21, 2016 9:19 PM

पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, संभाजीराव पाटलांचा कर्ज घोटाळा गावागावात, प्रत्येकाच्या मनात ठसवा, अशी सूचना अजित पवार यांनी दिली

ऑनलाइन लोकमत

उदगीर, दि. 21 - मार्केटिंगच्या जोरावर सत्तेत आलेल्या हे सरकार भ्रष्ट आहे़ त्यांचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत़ पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, संभाजीराव पाटलांचा कर्ज घोटाळा गावागावात, प्रत्येकाच्या मनात ठसवा, अशी सूचना रविवारी उदगीर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना निशाण्यावर घेतले़उदगीर येथे आयोजित रायुकाँच्या केडर कॅम्पमध्ये पदाधिकाऱ्यांनी रविवारी अजीत पवार यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, निरीक्षक हरीहरराव भोसीकर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, प्रदेश चिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, महिला जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, माजी आ़शिवराज तोंडचिरकर, कार्याध्यक्ष बबन भोसले, तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समद शेख, रायुकाँ़ जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी आ़ अजित पवार म्हणाले पक्षात कोणताही गैरप्रकार व बंद पाकीटाचे व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत़ तळागाळापासून पक्ष बळकट करुन जनतेसमोर योग्य पर्याय ठेवा, जनता नक्की बदल घडवेल़ मार्केटिंगच्या जीवावर निवडून आलेले मोदी सरकार जास्त काळ टिकणार नाही़ मराठवाड्यात राजकारणाची मोठी पोकळी निर्माण झाली असून याचा फायदा घेत पक्षाची ताकत तरुणांनी वाढवावी़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वशीला नाही तर कार्य पाहिले जाते़ पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून प्रामाणिकपणे समोर येवून काम करा व ग्रामपंचायतीपासून पक्ष बळकट करा असा संदेश अजित पवार यांनी दिला़शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपत असून राज्य सरकार अजुनही ठोस पावले उचलत नाही़ तिकडे केंद्र सरकार १३५ रुपये दराने डाळ आयात करते़ परंतु, शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही़ अशा या शेतकरीविरोधी सरकारचे पितळ उघडे पाडण्याचे निर्देशही पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले़