शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

औराद शहाजानीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती,रस्ते खरडून गेल्याने मोठे नुकसान

By संदीप शिंदे | Published: July 09, 2024 3:19 PM

सोमवारी रात्री ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरामध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते बारा वाजेदरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, औराद-तगरखेडा रस्त्याचा पुलाचा भाग वाहून गेला. त्याशिवाय अनेक गावांचा सकाळपर्यंत संपर्क पाण्यामुळे तुटलेला होता.

औराद शहाजानीमध्ये ७ जून रोजीही असाच पाऊस झाला होता. त्याची १०९ मिलिमीटर नोंद झाली होती.  यानंतर पुन्हा एक महिन्यात दुसऱ्यांदा पाऊस सोमवारी रात्री झाला असून, त्याची ११६ मिलिमीटर नोंद झाली आहे. औराद शहाजानी परिसरात झालेल्या या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जोराच्या पावसामुळे औराद-तगरखेडा पुलाची एक बाजू वाहून गेल्याने मंगळवारी सकाळपर्यंत वाहतूक बंद होती. तर या भागातील अनेक ओढ्याना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

माती वाहून गेल्याने शेतीचे नुकसान...औराद शहाजानी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले असून, काही शेतातील माती वाहून गेली आहे. आतापर्यंत या भागांमध्ये ४४५ मिलिमीटर पाऊस पडल्याची औराद शहाजनी हवामान केंद्रावर नोंद झाल्याचे मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, जून आणि जुलै अशा दोन महिन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून, नुकसान झाले आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र