रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे पोषण अभियानाचा जिल्हास्तरीय प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बाेलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी आदी उपस्थित होते.
यावेळी सीईओ गोयल यांनी पोषण माह, डिजिटल अंगणवाडी, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांचे कोविड लसीकरण शंभर टक्के करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सभापती ज्योती राठोड यांनीही अभियानासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मातृत्व योजना, ज्येष्ठ नागरिक सर्व्हे व पाेषणविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष केंद्रे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आपली अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी हॅपीहोम उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. हे अभियान राबविताना कोविडसंदर्भातही आणखी जनजागृती करावी, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले. अभार बी.एम. बंडगर यांनी मानले. कार्यक्रमास गटविकास अधिकारी अभंगे, क्षीरसागर आदी उपस्थित होते.