रेणा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय लोकार्पण समारंभात ते गुरुवारी बोलत होते.
यावेळी आ. धीरज देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, माजी आ. वैजनाथ शिंदे, त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे चेअरमन ॲड. श्रीपतराव काकडे, युनिक अकॅडमी पुणेचे संचालक तुकाराम जाधव, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, विवेक घोटाळे, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन देशमुख, पृथ्वीराज शिरसाट, विजय देशमुख, रवींद्र काळे, श्याम भोसले, गजभारे, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी विषयांचे वाचन केले. यावेळी संगोयाेचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील, रेणाचे संचालक प्रेमनाथ आकनगिरेए प्रवीण पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजी रेड्डी, धनराज देशमुख, संजय हरिदास, शहाजी हाकेे, तानाजी कांबळे, वैशालीताई मानेे, अमृताताई देशमुख, लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, रविशंकर बरमदे, आकुसकर आदी उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख यांनी मानले.
उद्योगासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य...
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, आता शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी करायची आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत उतरणे गरजेचे आहे. या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. या सेंटरच्या माध्यमातून चांगले अधिकारी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकून मोठे उद्योग उभारावेत. सोयाबीनवर प्रक्रिया प्लाॅन्ट, सोलर पंप व अनेक उद्योग उभारण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबिवला जाणार आहे. आम्ही पाच वर्षांतील एक महिना राजकारण आणि उर्वरित चार वर्षे अकरा महिने समाजकारण करण्याचे लोकनेते विलासराव देशमुख यांचे तत्त्व पुढे घेऊन जात आहोत.
आमदार धीरज देशमुख यांनी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारच्या विविध योजना गावा-गावांमध्ये पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.