लातूर : केंद्र शासनाने पारित केलेले कायदे शेतकरी व कामगार विरोधी आहेत. या कायद्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने लातूर शहरामध्ये दोन दिवसांपासून स्वाक्षरी व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील पाच नंबर चौकामध्ये रविवारी या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, संजय ओव्हळ, राम कोंबडे, महेश काळे, प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. सोमवारी पाण्याची टाकी परिसरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. चंद्रकांत साळुंके ॲड. बाबासाहेब गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही जनजागृती...कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. कामगार व शेतकरी विरोधी कायद्याबाबत जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या स्वाक्षरी मोहिमेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, कृउबाचे सभापती ललितभाई शहा, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव, उपसभापती मनोज पाटील, अभय साळुंके, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, रमेश सूर्यवंशी, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, अजिंक्य सोनवणे, तुळशीराम गंभिरे आदी सहभागी झाले होते.