अहमदपूर तहसीलदारांच्या दालनात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:15 PM2018-10-08T18:15:44+5:302018-10-08T18:16:45+5:30
महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला.
अहमदपूर (लातूर ) : महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. तहसीलदार अरुणा संगेवार यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हे आंदोलन जवळपास २ तास सुरु होते़ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन झाले़ यात जि़प़चे माजी अध्यक्ष घुमनवाड गुरुजी, सेवा दलचे तालुकाध्यक्ष हेमंत माकणे, सिराज जहागीरदार, शहराध्यक्ष विकास महाजन, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष एजाज सय्यद, देवानंद मुळे, जावेद बागवान, रवि महाजन, युवराज पाटील, प्रकाश ससाणे, सतीश क्षीरसागर, दिलीप कदम, बालाजी कातकडे, हंसराज सोमवंशी, शिवाजीराव भदाडे, उत्तम टेकाळे, शरद भदाडे, गणेश इंद्राळे, शेषराव पौळ, नवाज पठाण, दत्ता खंदाडे, राजेंद्र चव्हाण, अशोक भदाडे, विठ्ठल मोरे, सोमेश्वर कदम, गणेश कोदळे, गणेश शेळके, किशोर मोरे, शिंदे, महंमद पठाण, बापू होनराव, महादूअप्पा कल्याणी, बाबूराव कल्याणी, भरत पाटील, विजय नरवटे, मधू वडसे, शरद कासले, संदीप गुट्टे, फेरोज शेख, आप्पाराव शेळके, शहाजीराव पाटील, शांताराम माने, डिगांबर सूर्यवंशी, महेश बिरले, रवि कबीर, अमोल पाटील, ईश्वर करनाळे, मुन्ना शेख, नाथराव चव्हाण, केशव बोडके, भाऊसाहेब जाधव, संभाजी माकणे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़
हेक्टरी २५ हजारांचे अनुदान द्या़
तालुक्यातील पिकांची दाखविण्यात आलेली पैसेवारी ही चुकीची आहे़ त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी तसेच पीकविम्यासाठी अडचणी येऊ शकतात़ पैसेवारी दुरुस्त करुन ती ५० टक्क्यांच्या आत दाखवावी़ खरीपातील पिकांचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजार अनुदान द्यावे़ खरिपाचा विमा विमा त्वरित मंजूर करून ५० टक्के आगाऊ रक्कम द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या़ दरम्यान, तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़