शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

जॅमर लावण्यावरून वाद; दुचाकी चालकाच्या मारहाणीत टोइंग कर्मचाऱ्याचा हात फ्रॅक्चर 

By राजकुमार जोंधळे | Published: September 08, 2023 2:02 PM

लातूरतील घटना : या प्रकरणी तिघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे

लातूर : टोइंग वाहनावरील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना लातुरात  घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहर महापालिकेच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला काम दिले आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना जॅमर लावणे, दंड वसूल करणे आदी कामे या एजन्सीकडून केली जातात. गुरुवारी सायंकाळी सुभाष चौकात एका व्यक्तीने नो पार्किंग झोनमध्ये दुचाकी लावली. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने त्यांच्या दुचाकीला जॅमर लावले. त्यावेळी त्या व्यक्तीने आणि इतर दोघा महिलांनी कर्मचारी बालिका कांबळे यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना उपचारासाठी लातूरतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबनुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरात वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे...सध्या सणासुदीचे दिवस असून, लातूर शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. या स्थितीमध्ये वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दंडात्मक कारवाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर