शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
2
२ लाखांचा DD घेऊन मोहन चव्हाण 'मातोश्री'वर पोहचले; पोलिसांनी गेटवरच अडवले, काय आहे प्रकरण?
3
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
4
गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव
5
हिजबुल्लाहसाठी पेजर बनवणारी तैवानी कंपनीचा खुलासा; युरोपियन कनेक्शन जोडले
6
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
7
महागड्या रिचार्जपासून होणार सुटका! सरकार ५ कोटी Wi-Fi हॉटस्पॉट बसवणार, स्वस्तात मस्त Unlimited इंटरनेट मिळणार!
8
Reliance Jio चा धमाका; Jio 91 Recharge मध्ये संपूर्ण महिन्यासाठी मिळणार Unlimited Calling, Data
9
'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."
10
'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
11
पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!
12
"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 
13
"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा
14
Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
15
'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
17
Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!
18
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
19
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
20
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी दोषींना सोडणार नाही; जनतेची माफी मागत अजित पवारांचे वचन

By संदीप शिंदे | Published: August 28, 2024 7:49 PM

मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो: अजित पवार

अहमदपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनतेची माफी मागितली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो, अशी भावना त्यांनी बुधवारी व्यक्त केली.

अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे तर मंचावर क्रीडामंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, सूरज चव्हाण, ॲड. व्यंकट बेद्रे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व जातिधर्माच्या लाेकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेने पक्षाची वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये काम करीत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. विरोधक यावर दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. याकडे जनतेने दुर्लक्ष करावे, सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी...अहमदपूर येथील जिजाऊ फंक्शन हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा सभागृहाच्या समोर देण्यात आल्या. आरक्षण आमच्या हक्काचे असून ते मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी सुरू असताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री पवार हे कार्यक्रम संपवून बाहेर जातानाही पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी तरुणांनी घोषणाबाजी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज