शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

CoronaVirus : लातुरात मोफत भाजीपाल्यासाठी नागरिक रस्त्यांवर ! पोलिसांनी पांगवला जमाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 6:17 PM

गरजूंना मोफत भाजीपाला वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ

ठळक मुद्देलातुरातील साळे गल्ली येथील प्रकार मदत करायची असल्यास घरी जाऊन मदत करा

लातूर :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्याने अनेकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी इतरांकडे पाहण्याची वेळ आली आहे़ गरजूंना विविध सामाजिक संस्था, संघटना मदत पोहचिवण्याचे काम आहेत़ शहरातील साळे गल्ली भागात गरजूंना भाजीपाला वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू असताना शेकडो लोकांची गर्दी उसळली़ अखेर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घ्यावी लागली़ गर्दी पांगताच  पोलिसांनी आयोजकालाही चांगलीच समज दिली़

 प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीही पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे़ गर्दी कमी करण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत़ हे सर्व सुरळीत सुरू असताना लातूर शहरातील साळे गल्ली भागात मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने गरजू लोकांना मोफत भाजीपाला वाटप सुरू केला होता़ ही माहिती परिसरात कळताच लोकांनी मोठी गर्दी केली़ त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला़ इथे ना सोशल डिस्टन्स, ना कुणाच्या आरोग्याची काळजी़ याबाबत काही सजग नागरिकांनी हा प्रकार मनपाचे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांना सांगितला़ भाजी घेण्यासाठी महिलांसह मुलेही रांगेत उभी होती़ शेकडो लोक रस्त्यावर आल्याचे सांगण्यात आल्याने किसवे यांनी तात्काळ विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सदरील माहिती देत पोलिसांना पाचारण केले़ घटनास्थळी पोलिस दाखल होताच नागरिकांनी पळ काढला़ काही वेळातच गर्दी पांगविण्यात आली़ तद्नंतर पोलिसांनी संयोजकाला समज दिली़ 

मदत करायची तर घरपोच करा़़़लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाºया अनेक मजुरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ अशाच लोकांचा शोध घेऊन सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था घरपोच धान्य पुरवठा करीत आहेत़ अशा लोकांना महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन सहकार्य करीत आहे, ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी गरजवंतांना शोधून मदत करा़ एकाच ठिकाणी गर्दी होईल असे कृत्य करू नये़ स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला यावेळी क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांनी दिला़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर