लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३९२ पैकी ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, २७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४३ अहवाल प्रलंबित असून, २२ अनिर्णित, २ स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आले आहेत. आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख ६०९ वर पोहोचला आहे.
गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर तालुक्यात २९, उदगीर ११, अहमदपूर ५, निलंगा ६, औसा २ अशा एकूण ५३ जणांचा समावेश असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.