लातूर : रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालानुसार लातूर जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. लातूर शहरातील ४, उदगीर ५ आणि अहमदपूर तालुक्यातील २ असे एकूण ११ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
लातूर जिल्ह्यात रविवारी एकूण ११० व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी ९३ निगेटिव्ह आले असून, ११ पॉझिटिव्ह तर ६ स्वॅबचे अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. दरम्यान लातूर जिल्ह्यात रुग्णाचा आलेख ९३ वर पोहोचला आहे.