लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी एकूण ११२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकूण ३९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ते लातुरातील भुसार लाईन, शाहवली मोहल्ला येथील प्रत्येकी एक आहे. तसेच खाडगाव येथील बाधिताच्या संपर्कात आलेले चौधरी नगर येथील तिघेजण पॉझिटिव्ह आहेत. लातूर ग्रामीणमध्ये बाभळगाव येथील बाधिताच्या संपर्कातील दोन व पाखरसांगवी येथे एकजण पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच उदगीरच्या विकास नगरातील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच बरोबर उदगीरातीलच हनुमान नगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधीष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात बाधितांची संख्या १८६ इतकी झाली असून, यापूर्वीच ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५० जणांवर उपचार सुरू आहेत.