लातूर : जिल्ह्यात रविवारी आणखी १९ रुग्ण वाढले असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता कोरोना बाधितांचा आलेख ४५२ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा २३ वर गेला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी २४० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १९ पॉझिटिव्ह आले आहेत. २२ अहवाल अनिर्णित ठेवले असून, ३५ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, ४ जुलै रोजीचे २५ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय, ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुटी देण्यात आली आहे.
उदगीर येथील एका ७४ वर्षीय बाधित रुग्णाचा, तर लातूर येथे ६५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.