लातूर : येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी २७५ अहवाल तपासण्यात आले. त्यात २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात गुरुवारी प्रलंबित असलेल्या अहवालातील १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. शुक्रवारी २१७ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर १७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्याचबरोबर ११ जणांचे स्वॅब रद्द झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता ६४७ इतकी झाली आहे. सध्या २९७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३२२ इतकी आहे. शुक्रवारी आणखी तिघांचा कोरोनाने बळी घेतला असून, आता बळींची संख्या ३२ वर पोहोचली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. लातूर शहरातील एलआयसी कॉलनी, मिस्किनपुरा आणि एसटी कॉलनी येथील सदर रुग्ण रहिवासी होते.