लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी २११ स्वॅबची तपासणी करण्यात आली़ त्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ तर ९ जणांचा अहवाल अनिर्णीत असून, १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ कोरोना काळात पहिल्यांदा लातूर जिल्ह्यात उच्चांकी एकाच दिवशी २९ जण पॉझिटिव्ह आल्याने धक्का बसला आहे़.
दरम्यान, जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ३०९ वर पोहोचली आहे़. शनिवारी एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे मयतांची संख्या १६ झाली आहे़ तसेच शनिवारी सात जणांना सुटी देण्यात आल्याने उपचारानंतर बरी झालेल्यांची आतापर्यंतची संख्या १९७ असून, सध्या ९४ जणांवर उपचार सुरू आहेत़ लातूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांपैकी औसा ९, अहमदपूर ७, उदगीर ३ व लातूर शहरातील १० रूग्णांचा समावेश असल्याची माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ़ विजय चिंचोलकर यांनी दिली़.