ठळक मुद्दे३५ पैकी १९ पॉझिटिव्ह, १० अनिर्णित तर ४ अहवाल निगेटिव्ह आहेतसध्या २०७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
लातूर : लातूर जिल्ह्यात रविवारी तपासण्यात आलेल्या एकूण अहवालापैकी ३५ जणांचे अहवाल प्रलंबित होते. ते सोमवारी प्राप्त झाले असून, त्यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३ लातूर तालुक्यातील असून, १६ निलंगा तालुक्यातील आहेत.
३५ पैकी १९ पॉझिटिव्ह, १० अनिर्णित तर ४ अहवाल निगेटिव्ह आहेत, अशी माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजयकुमार चिंचोलकर यांनी दिली. निलंगा तालुक्यातील १६ पैकी १४ शहरातील आहेत, तर २ ग्रामीण भागातील मदनसुरी येथील आहेत. आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख ४७१ वर पोहोचला असून, आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.