लातूर : जिल्ह्यात रविवारी आणखी ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, बाधित रुग्णांचा आलेख आता १९१ वर पोहोचला आहे.
रविवारी आढळलेल्या ५ रुग्णांमध्ये लातूर शहरातील ३, निलंगा व उदगीर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी ६० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तिघा जणांचे अहवाल अनिर्णित, ५ पॉझिटिव्ह तर २१ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. आता जिल्ह्यात ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.