ठळक मुद्देआंध्रप्रदेशच्या ८ यात्रेकरूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
लातूर : जिल्ह्यात स्थानिकांना कोरोना बाधा नाही, मात्र निलंगा मुक्कामी राहिलेल्या आंध्रप्रदेशच्या ८ यात्रेकरूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील ७ जणांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. १ अहवाल प्रलंबित आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर म्हणाले, बाधित ८ जणांचा क्वारंटाईन कालावधी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाला असून सर्वांची पहिली चाचणी करण्यात आली त्यात ७ अहवाल प्राप्त असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. १ प्रलंबित आहे. तसेच सर्वांची आणखी एक चाचणी होईल त्यानंतर कोरोना अहवाल अंतिम जाहीर होईल. तूर्त ७ अहवाल निगेटिव्ह आले ही दिलासादायक बातमी आहे.