लातूर : विनापरवाना हॅण्डवॉश, व्हॉईट फेनिलची निर्मिती करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये धाड टाकली़ यात १ लाख ९७ हजार ३९६ रुपयांचे उत्पादित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधासाठी हॅण्डवॉशची मागणी वाढली आहे़ दरम्यान, शहरानजीकच्या हरंगुळ येथील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये विनापरवाना हॅण्डवॉश व व्हॉईट फेनिलची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली़ त्यावरुन औषध निरीक्षक योगेंद्र पौळ व एस़एस़ बुगड यांनी सदरील ठिकाणी मंगळवारी धाड टाकली़
यावेळी कुठल्याही परवान्याविना ही निर्मिती करण्यात येत असल्याचे आढळून आले़ त्यामुळे अधिकाºयांनी त्याची पाहणी करुन तयार करण्यात आलेले हॅण्डवॉश, व्हाईट फेनिल तसेच अन्य साहित्य जप्त केले़ त्याची किंमत १ लाख ९७ हजार ३९६ रुपये आहे़ याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरु आहे़कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खाजगी व शासकीय रुग्णालयात गुणवत्तापूर्ण मास्क, सॅनिटायझर व औषधांचा योग्य दरात पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मोहीम राबवित आहे़ अशा परिस्थितीत काहीजण विनापरवाना हॅण्डवॉश व अन्य साहित्याचे उत्पादन करीत असल्याचे आढळून आल्यास धाड टाकून कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस़एस़ काळे यांनी सांगितले़नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे़़़
सदरील साहित्य जप्त करण्यात आले असून त्यातील नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे औषध निरीक्षक योगेंद्र पौळ यांनी सांगितले़ यापुढे ही मोहीम सुरु राहणार असल्याचे औषध निरीक्षक एस़एस़ बुगड यांनी सांगितले़