लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी ३७ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८ अहवाल निगेटिव्ह आले असून, ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक अहवाल अनिर्णित आहे.
लातूर शहरातील टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर, खाडगाव रोड येथे प्रत्येकी १ असे एकूण ४ रुग्ण आहेत. तर लातूर तालुक्यातील भिसेवाघोली १, औसा तालुक्यातील अंधोरी १ व चाकूर तालुक्यातील सुगाव येथे १ जण पॉझिटिव्ह आला आहे. उदगीर शहरातील सराफ लाईन येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एका रुग्णाची हृदय शस्त्रक्रिया झाली असून, दोन व्यक्तींना किडणीचे आजार आहेत. एका ३६ वर्षीय रुग्णाची चार वर्षांपूर्वी किडणी ट्रान्सप्लांट झाली आहे, अशी माहिती विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५७ झाली असून, यातील १२८ जणांना यापूर्वीच सुटी देण्यात आली आहे. शिवाय, चार जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.