ठळक मुद्देओपीडी बाबत नियमात शिथिलता
लातूर : खाजगी दवाखान्याची अत्यावश्यक सेवा सुरू आहेच शिवाय ओपीडी सुद्धा संपूर्ण काळजी घेऊन सुरू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जी श्रीकांत म्हणाले, नियोजित शस्त्रक्रिया, जे जे तातडीचे नाही यासाठी दवाखान्यात गर्दी करून क्रॉस इन्फेक्शन वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. डॉक्टर आपल्यासाठी आहेत. आपण घरीच राहिले पाहिजे. मात्र आजारी असताना, तातडीची गरज ज्यावेळी आहे तेव्हा आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यामुळे ओपीडीबाबत आधीच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.