लातूर : शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तर दुसरा उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २९ व्यक्तींचे स्वॅब गुरुवार रात्रीपर्यंत तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे.उदगीर उपजिल्हा रुग्णालय येथुन एकुण ३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असून त्यापैकी ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह व एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चाकुर येथील दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले, त्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व २ व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत. मुरुड येथील ७ पैकी ७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहमदपूर येथील ९ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३ अहवाल प्रलंबित आहेत. लातूर स्त्री रुग्णालयातून ६ पैकी ६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील असे एकुण ९५ स्वॅब तपासणीसाठी आले, त्यापैकी ८७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून २ अहवाल पॉझिटिव्ह तर ६ प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
बिदरहून आलेला एकजण लातुरात पॉझिटिव्ह ....
लातुरात उपचार घेत असलेला नवा रुग्ण बिदर येथील असून तो लातूर येथील लेबल कॉलनीत आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. तर दुसरा उदगीर येथील असून हनुमान कट्टा परिसरातील रहिवासी आहे. दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने घेतला जात आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा आलेख ७३ वर पोहोचला आहे.