लातूर : उदगीर मधील कोरोनाबाधित मयत महिलेच्या संपर्कातील आणखी एकाचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ७ बाधितांवर उपचार सुरू असून त्यात आणखी एकाची भर पडली आहे.
३० एप्रिल रोजी केवळ उदगीरचे २० स्वॅब तपासणीला लातूरच्या प्रयोगशाळेत आले. त्यापैकी १७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३ व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. त्यांपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन व्यक्तींची ४८ तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान दिनांक १ मे रोजी एकूण ५३ व्यक्तींचे स्वॅब (कोविड-१९) तपासणी साठी आले होते. त्यापैकी ३९ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्या सर्व ३९ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित १४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी चालू असून रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.