ताप आला म्हणजे कोरोना नाही, पण...
ताप आला म्हणजे काेरोना आहे असे नाही. परंतू, सध्याची परिस्थिती लक्षात घेता लहान मुलांचा ताप अंगावर घेऊ नये, तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरुन उपचार लवकर घेऊन ताप घालवता येईल.
लहान मुलांसाठी अद्याप लस नाही. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तात्काळ आपल्या बालरोगतज्ञ्जांना दाखवून तपासणी करावी.
सर्दी, ताप, खोकल्याची साथ...
सध्याचे वातावरण साथ आजारजन्य आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकल्याची साथ आहे. डेंग्यूसदृश रुग्णही आढळत आहेत. सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
बालकांसाठी कोविड केअर सेंटर...
खाजगी व सरकारी दवाखाने मिळून बालकांसाठी २०० बेड तयार ठेवण्यात आले आहेत. दुर्दैवाने साथ आलीच तर उपचारासाठी यंत्रणा सक्षम रहावी, यासाठी खाजगी व शासकीय स्तरावर कोविड केअर सेंटर स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
घाबरू नका, काळजी घ्या...
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग अत्यंत कमी आहे. बालकांनी तर त्याची लागण अद्याप नाही. मात्र, डेंग्यूसदृश रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. घाबरण्याचे कारण नाही. - डॉ. संदीपान साबदे, बालरोगतज्ज्ञ