लातूर - १२५ कलावंतांच्या चमूने ९० तासांपेक्षा अधिक वेळ परिश्रम घेऊन अडीच एकरात रांगोळीतून साकारलेल्या शिवछत्रपती शिवरायांची महाप्रतिमा पाहण्यासाठी क्रीडा संकुलात अलोट रविवारी गर्दी झाली.शिवजन्मोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून शिवछत्रपती शिवरायांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात येत आहे़ क्रीडा संकुलातील अडीच एकरावर महारांगोळी साकारण्यात आली आहे़ या रांगोळीतून शिवछत्रपती शिवाजी महाराजांची महाप्रतिमा तयार करण्यात आली आहे़ जगातील सर्वात मोठी रांगोळी असल्याचा दावा संयोजन समितीने केला असून या कलाकृतीची गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद होण्याची शक्यता संयोजकांनी व्यक्त केली आहे.ही विश्वविक्रमी रांगोळी पाहण्यासाठी रविवारी खुली करण्यात आली़ शिवप्रेमींनी क्रीडा संकुलाच्या मैदानावर अलोट गर्दी केली होती़ संयोजकांनी रांगोळी पाहण्यासाठी खास व्यवस्था संकुल परिसरात केली आहे़ शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अक्का फाऊंडेशनने हाती घेतला आहे.रांगोळीतून साकारलेली शिवरायांची महाप्रतिमा पाहण्यासाठी गर्दी होत असून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे लातूर लोकसभा अध्यक्ष धीरज देशमुख, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही ही महाप्रतिमा पाहून कलावंतांचे कौतुक केले.
व्हिडिओ पाहा