श्री गुरु हावगीस्वामी महाराजांची यात्रा पौंष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत सुरू असते. निजामकाळापासून ही यात्रा दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा संपल्यानंतर तेथील भाविक उदगीरच्या यात्रेत सहभागी होतात. दरवर्षीच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील पशुप्रदर्शन होय. यात पूर्वी घोडे, ऊंट दाखल होत असत. त्यामुळे उदगीरच्या यात्रेत मोठी उलाढाल होत असे. अग्गी तुडवल्यानंतर उदगीरच्या आडत व्यापाऱ्यांकडून दरवर्षी कुस्त्यांच्या फड रंगत असतो. त्यासाठी मराठवाड्यासह कर्नाटक व तेलंगणातून पैलवान येतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि बर्ड फ्ल्यूमुळे पशु व पक्षी प्रदर्शन होणार नसल्याचे तालुका पशुधन अधिकारी सतीश केंद्रे यांनी सांगितले. नगरपालिकेसमोर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे म्हणाले. जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार नसल्याची माहिती आडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे यांनी दिली.
उदगीरातील पशुप्रदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:09 AM