दोन- तीन दिवसांपासून उकाडा अधिक जाणवत होता. त्यामुळे अंगाची लाही- लाही होत होती. वातावरणात उष्णता वाढली होती. दरम्यान, रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जळकोट व परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नाले खळाळून वाहिले. या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.
सध्या शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यातच सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पत्र्यावर पावसाचे पडलेले पाणी नागरिक भरत होते. या पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी आंब्याचे नुकसान झाले आहे. गत आठवड्यातही मुसळधार अवकाळी पाऊस होऊन तालुक्यातील केशर आंब्याच्या बागांचे नुकसान झाले होते. तसेच शेतातील हळद, उन्हाळी भुईमुग, उन्हाळी हायब्रीड या पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.